माजलगाव: गंगामसला आरोग्य केंद्रात शिरले पाणी;मुसळधार पावसाचा कहर
माजलगाव तालुक्यातील गंगामाला प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता, पावसाचे पाणी शिरल्याने आरोग्य सेवेत अडथळा निर्माण झाला आहे. गंगामाला परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आरोग्य केंद्राच्या इमारतीत पाणी साचले असून रुग्ण व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.आरोग्य केंद्रातील उपचारगृहे, औषधसाठा आणि रुग्णालयीन साहित्य या पाण्यामुळे बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, गंगामाला ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने पाणी