वर्धा: पथदिवे बंद असल्याने पिंपरी मेघे ग्रामस्थ अंधारात; नवरात्रीपूर्वी समस्या निवारणाची मागणी
Wardha, Wardha | Sep 16, 2025 वर्धालगतच्या पिंपरी मेघे गावातील रहिवाशांनी रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. युवा संघर्ष सामाजिक संघटनेने पुढाकार घेत साहू हॉस्पिटल ते जुनापाणी चौक या महत्त्वाच्या रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून हे दिवे बंद असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आज 16 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे