राहुरी: राहुरीतून चोरी गेलेला डंपर 9 लाख रुपयांच्या मुद्देमालासह हस्तगत, तीन आरोपींचा एलसीबीकडून पर्दाफाश
राहुरी तहसिल परिसरातून चोरीला गेलेला डंपर स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अवघ्या दोन दिवसांत शोधून काढला असून ९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती आज शनिवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली आहे