भुसावळ: वरणगाव शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या बिकट, शिवसेनेतर्फे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन
वरणगाव शहरात काही दिवसांपासून मोकाट भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. तसेच स्वच्छतेची समस्या देखील बिकट असून नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या त्वरीत सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी १५ सप्टेंबर रोजी शिवसेनेतर्फे वरणगाव नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.