माण: म्हसवड यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी काढली अधिसूचना
Man, Satara | Nov 18, 2025 म्हसवड येथे दरवर्षीप्रमाणे श्री सिद्धनाथाची यात्रा १९ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान साजरी होत आहे. यात्रेचा मुख्य दिवस २१ नोव्हेंबर असल्याने या दिवशी पारंपरिक रथोत्सव आयोजित केला जातो. या रथोत्सवासाठी दरवर्षी सातारा जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून सुमारे ४ ते ५ लाख भाविक येत असतात. यात्रेच्या काळात प्रचंड गर्दी होत असल्याने सातारा–पंढरपूर राज्यमार्गावरील वाहतूक व्यवस्थित पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बदल केले आहेत. तशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.