वर्धा: राजकारणात वारसा नव्हे,कार्य महत्त्वाचं! शरद पवारांचा वर्ध्यातून स्पष्ट संदेश: देशमुखांच्या मुलाऐवजी वांदिले जिल्हाध्यक्ष
Wardha, Wardha | Oct 19, 2025 वर्धा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात घराणेशाही विरुद्ध कार्यकर्त्यांची मेहनत, हा संघर्ष आज 19 ऑक्टो रोजी सायं 6 वाजता स्पष्टपणे दिसला.माजी आमदार सुरेश देशमुख यांचे पुत्र समीर देशमुख यांना जिल्हाध्यक्षपद मिळू शकले नाही. राजकीय वारसा असूनही त्यांना हुलकावणी मिळाली. याउलट, हिंगणघाटातील सामान्य कुटुंबातून आलेल्या, प्रामाणिक आणि सातत्याने कार्यरत असलेल्या अतुल वांदिले यांच्या खांद्यावर पक्षाने ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.