अमित बघेल द्वारे एका सोशल मीडियामध्ये सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल साई यांच्या विरुद्ध आपत्ती जनक शब्दात टिप्पणी केल्याबद्दल सिंधी समाजात रोष व्याप्त आहे. त्या दिशेने सिंधी समाजाच्या वतीने विशाल मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले. आपत्तीजनक टिप्पणी करणाऱ्या अमित बघेल यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.