महाबळेश्वर: तापोळा परिसरात दोन चंदन चोरांना गावकऱ्यांनी पकडले, मेढा पोलिसांच्या दिले ताब्यात
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा परिसरातील आपटी गावात चंदन चोरीचा प्रकार उघड झाला आहे, याप्रकरणी साताऱ्यातील दोघांना मेढा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे, याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोयना भाग 105 गावात, पहिल्यांदाच अशा प्रकारचा चंदन चोरीचा गुन्हा उघड झाला आहे, येथील गावकऱ्यांनीच दोन चंदन चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, दरम्यान याप्रकरणी वन विभागाने कारवाईसाठी हालचाली सुरू केली आहे.