धुळे: पारोळारोड उंचीकरणामुळे नागरिक त्रस्त; रस्ता खोदूनच काम करण्याची मागणी, पीडब्ल्यूडी अधीक्षक अभियंता निवेदन
Dhule, Dhule | Oct 18, 2025 धुळेतील पारोळा रोडवर गल्ली क्र. ७ ते जळगाव चौफुलीपर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या उंचीकरणामुळे नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. पावसाचे व सांडपाणी घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला असून, इंजि. अक्षय मुंडके यांच्या पुढाकाराने नागरिकांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. रस्त्याचे उंचीकरण थांबवून समांतर पातळीवर पुनर्बांधणी करावी, निधी मंजुरीपर्यंत खड्डे बुजवावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.