स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 विषयी स्वच्छ भारत मिशनच्या वतीने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलेली असून त्यांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करावयाच्या कार्यवाहीचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.राहुल गेठे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.