भंडारा जिल्ह्यातील रेती तस्करांविरुद्ध प्रशासनाने कंबर कसली असून, कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुरेवाडा-खमारी रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखा आणि महसूल विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान, सुरेवाडा शेतशिवारात विना परवाना रेती घेऊन जाणाऱ्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर (क्र. MH 36 Z 8509) ला विना क्रमांकाच्या ट्रॉलीसह रंगेहात पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे या अवैध प्रकार