धुळे: सोनगीर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच रात्री सहा मोटारसायकली लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Dhule, Dhule | Sep 17, 2025 धुळे तालुक्यातील सोनगीर व दापुरी पुनर्वसन गावात मंगळवारी पहाटे मोटारसायकल चोरट्यांनी दहशत माजवत एकाच रात्री सहा दुचाकी चोरल्या. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी, व्यापारी दिलीप धनगर यांच्यासह अन्य नागरिकांच्या गाड्यांचा समावेश आहे. दोन मोटारसायकली बेवारस स्थितीत आढळल्या. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, या धाडसी कृत्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनगीर पोलिस तपास करत आहेत.