विक्रमगड: जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता
प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात मंगळवारी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वत्र विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने किनारपट्टी भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी कापलेले पीक भिजू नये यासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.