मेहकर: दगडवाडी येथे घरकूल बांधकामावरून वाद, महिलेला चापट, लाथाबुक्क्यांनी मारहाण; चार जणांवर गुन्हा!,
दगडवाडी येथे घरकुलाच्या, बांधकामावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण, शिवीगाळ आणि जीव घेण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौसाबाई हरीभाऊ घुगे (५८, रा. दगडवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेजारी आनंदा संपत घुगे, शकुंतला आनंदा घुगे, अविनाश आनंदा घुगे आणि यश अविनाश घुगे यांनी मारहाण केली.