पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला अवघे तीन दिवस बाकी असताना पिंपरी चिंचवड शहरातील वातावरण अतिशय तणावपूर्ण होऊ लागला आहे. मध्यरात्री जवळपास एक वाजेदरम्यान प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार प्रियंका सुनील कुदळे यांच्या घरावर काही अज्ञात युवकांनी शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.