सेलू: मोर्चापुर शिवारात सर्पमित्राने दिले आठ फुटाच्या अजगराला जीवनदान!
Seloo, Wardha | Oct 15, 2025 सोयाबीनच्या शेतात असलेल्या 8 फूट लांबीच्या अजगराला ता. 15 ऑक्टोबर बुधवारला दुपारी 1 वाजता सर्पमित्र पप्पू कांबळे यांनी सुरक्षित रेस्क्यू करून जीवनदान दिले. तालुक्यातील मौजा मोर्चापूर येथील नंदकिशोर उमाटे यांच्या शेतात हा भलामोठा अजगर दडून बसला होता.