राधानगरी: केळोशी खुर्द खामकरवाडी, पिंपरीवाडी येथे ठाकरे गट शिवसेना शाखेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या हस्ते उद्घाटन
राधानगरी तालुक्यातील केळोशी खुर्द खामकरवाडी व पिंपरीवाडी येथे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रकांत पाटील होते. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले की आपण सर्वांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया. यावेळी युवराज बसरवाडकर व विजय पाटील यांची शाखाप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.