आमगाव: कौटुंबिक वादातून शहरात तरुणावर चाकूने हल्ला, गौवार्डातील घटना
Amgaon, Gondia | Nov 1, 2025 कौटुंबिक वादातून तरुणाला चाकूने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना गोशाळा वॉर्ड, न्यू जगन्नाथ मंदिर परिसरात ३० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली आहे.तक्रारीनुसार, ३० रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास, आरोपी चेतन कबीर सोनी (२२) याने पती आणि मुलासोबत भांडण करून धमकी दिली. याचदरम्यान आरोपीने रजत नरेश मेश्राम (१७) याच्यावर चाकूने छातीवर डाव्या बाजूस व डाव्या हातावर वार केला. ज्यामुळे तो गंभीररीत्या जखमी झाला.