राहुरी: तहसील आवारामध्ये दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांना शेतकरी सेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण
राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदार संघातील आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे काल हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील माणूस हरपला असल्याचे प्रतिपादन शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले. आज शनिवारी सकाळी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धाजली अर्पण करण्यात आली.