कळमेश्वर: तीडंगी गावासह जिल्ह्यातील 42 ठिकाणी आदिवासी पारधी समाजासाठी विशेष कॅम्पचे होणार आयोजन
कोणत्याही अवैध प्रकारचा मार्ग हा अधोगतीकडे नेणारा असतो. जागृत समाजाचे ते लक्षण नसून जे कोणी अशा मार्गाला वळले आहेत त्यांना अशा अवैध मार्गापासून परावृत्त करण्यासह नवीन संधीसाठी व रोजगारासाठी शासनासह समाजही तत्पर असणे महत्वाचे आहे. तिडंगी येथील अवैध दारु व्यवसायाकडे वळलेल्या लोकांना त्यांच्या आवडीनुरूप विधायक मार्ग मिळावेत स्वयंरोजगार मिळावा यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या दृष्टीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन तत्पर असल्याचे प्रतिपादन