बुलढाणा: न्याय ना मिळाल्यास हिरडव येथील फौजी आपल्या परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालय समोर करणार आत्मदहन
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुका अंतर्गतच्या हिरडव येथील रहिवासी देशसेवा करणाऱ्या सैनिक व त्याच्या परिवारावर जवळपास 40 जणांनी प्राणघातक हल्ला केला असून यात फौजि सह त्याच्या परिवारातील अनेक जण रक्तबंबाळ झालेले असतांना देखील लोणार पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित परिवाराने आज 28 ऑक्टोबर रोजी दुपारी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.