वडवणी: शहरातील गोपाळ नगर भागात, गुटखा बाळगणाऱ्या व्यक्तीवर कारवाई
Wadwani, Beed | Oct 16, 2025 वडवणी शहरातील गोपाळ नगर भागात, गुटखा बाळगणाऱ्या व्यक्तीवर गुरुवार दि.16 ऑक्टोबर रोजी, दुपारी 3 च्या दरम्यान कारवाई करत, त्याच्याकडून 74 हजार रुपयांचा गुटखा आणि आटोसह एकूण 2 लाख 24 हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. शेख फैसल शेख खलील वय 28 वर्ष राहणार तेलगाव नाका, याच्या विरोधात वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई वडवणी पोलीस ठाणे प्रभारी API वर्षा व्हगाडे,पोह विलास खरात, पोह् भास्कर राऊत, पो ह दादासाहेब उबाळे, पोलीस अंमलदार वसंत करे यांनी केली.