जालना: समन्स बजावणीतील विलंबावर मद्रास उच्च न्यायालयाची ताशेरेबाजी;ई-समन्सची सक्तीने अंमलबजावणीची अॅड.महेश धन्नावत यांची मागणी
Jalna, Jalna | Nov 2, 2025 फौजदारी तक्रारीतील आरोपीला समन्स बजावण्यासाठी तब्बल 12 वर्षे लागल्याच्या धक्कादायक घटनेवर मद्रास उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस आणि न्यायालयीन कर्मचार्यांनी कर्तव्यदक्षतेत केलेल्या गंभीर त्रुटींवर न्यायालयाने बोट ठेवत, भविष्यात अशी दिरंगाई टाळण्यासाठी ई-समन्स प्रणालीची देशभर सक्तीने आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या निर्णयावर अॅड. महेश धन्नावत यांनी रविवार दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रतिक्री दिली.