जालना शहरातील गोपीकिशन नगर परिसरात गोवंश जातीच्या वासराचे मुंडके आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बुधवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी गौरव प्रल्हाद देशमाने यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीनुसार, दि. 6 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी बडीसडक परिसरात असताना त्यांना त्यांचे मित्र अक्षय देवचंद राजपूत यांचा फोन आला.गोपीकिशन नगर येथील खरे निवास घरासमोर गोवंश वासराचे मुंडके पडले होते.