चिखली: आरोग्याच्या रक्षणकर्त्यांचा मुंबई येथे आयुष महासन्मान पुरस्कार देऊन आ. श्वेता ताई महाले यांनी केला गौरव
नवी मुंबई येथे 'आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन'द्वारा आयोजित 'आयुष महासन्मान पुरस्कार 2025' या सोहळ्यास चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी उपस्थित राहून आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांच्या योगदानाचा गौरव केला व पुरस्कारप्राप्त सर्व डाॅक्टरांचे त्यांनी अभिनंदन केले.सर्व प्रकारच्या वैद्यकीय व्यावसायिकांना सामावून घेणारी ही संस्था आहे.