बिलोली: बिलोली येथे राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार आणि उमेदवाराच्या पतीला घरात डांबून ठेवल्याने बिलोलीत राडा
Biloli, Nanded | Nov 21, 2025 आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दोनच्या दरम्यान बिलोली येथे मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवार मैथिली कुलकर्णी यांच्या विरोधात वॉर्ड क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी कडून विजयालक्ष्मी हरणे ह्या उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून विजयालक्ष्मी हरणे आणि त्यांच्या पतीला मराठवाडा जनहित पार्टीच्या लोकांनी डांबून ठेवल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. उमेदवाराला डांबून ठेवल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे घेतली धाव. महिला उमेदवार विजयालक्ष्मी हरणे यांची पोलिसांनी केली सुटका