धामणगाव रेल्वे: दत्तापुर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेल्याची पोलिसात तक्रार
दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने अज्ञात इसमाविरोधात तक्रार दिली आहे की, फिर्यादी महिलेची मुलगी ही शाळेत जात आहे म्हणून घरून निघून गेली .तिचा शाळेत व नातेवाईकात शोध घेतला असता ती मिळून आली नाही .फिर्यादी हिच्या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेले अशी तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे. तेव्हा पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.