वडवणी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन आरोपी व पीडिता सांगली जिल्ह्यात ऊसतोडी करीत होते. बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पल्लवी जाधव यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन पीडितेची सुटका केली. यातील आरोपी व पीडितेला वडवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वडवणी पोलीस ठाणे येथील अल्पवयीन मुली सबंधि गुन्हा गुन्हा दाखल आहे. याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या कक्षाच्या पीएसआय पल्लवी जाधव यांनी तांत्रिक तपास करत अटक केले.