कळमेश्वर: गोंडखैरी येथे पंधरवाडा उपक्रम आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न
आज दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा उपक्रम आणि मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत गोंडखैरी येथे भव्य कार्यक्रम संपन्न झाला.मा. पंतप्रधानांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, तसेच झाडे लावा – झाडे जगवा हे अभियान राबविण्यात येणार आहे.