चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलिजंजा भागातून चंदावाघिणीला केले जेरबंद, आता तिचा सह्याद्री कडे प्रवास सुरू
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि वाघांची संख्या मर्यादित करण्यासाठी वनविभागाने आखलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून राज्यातील व देशातील इतर व्याघ्र प्रकल्पात वाघ वाघिणींचे स्थलांतर केले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात नवेगाव जंगलात असलेल्या चंदा आणि चांदणी या दोन वाघिणींना राज्यातील कोकण- पश्चिम महाराष्ट्राची सीमा असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलविण्याचा निर्णय झाला होता. या दोन्ही वाघिणींनी कधीही मानवावर ह