कोपरगाव: गणेशनगर येथील गणेश सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन
गणेशनगर येथील गणेश सहकारी साखर कारखाना येथे आज २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा.युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते दीपावली निमित्त लक्ष्मीपूजन करण्यात आले.तसेच जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले, सभासद श्री सोपानराव क्षिरसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी, शिवाजीराव लहारे, उत्तमराव मते, बी.एल.आहेर , सुरेशराव चौधरी, सचिन आहेर, लवांडे सर, डी.डी.पवार, डॉ. एकनाथजी गोंदकर, अरविंदराव फोफसे ,डॉ लबडे उपस्थित होते.