औंढा नागनाथ तालुक्यातील मार्डी शिवारात आमच्या शेतात शेळ्या का आल्या असे विचारल्याने एका महिलेस शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना दिनांक 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी शोभा पवार यांच्या फिर्यादीवरून नागोराव वाघमारे,कैलास वाघमारे यांच्यासह अन्य एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक चार नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शंकर भिसे करत आहेत