जाफराबाद: सिपोरा, आंभोरा, हनुमंत खेडा येथे पूर्णा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी महसुली विभागाने बुडवल्या पाण्यात
आज दिनांक 23 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 3वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा हनुमंत खेडा यासह जाफराबाद तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रात अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या बोटी महसूल विभागाने नदीपात्रात नेऊन पाण्यात सोडून बुडवून नष्ट केले आहे, सदरची कारवाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून जाफराबादचे तहसीलदार डॉक्टर सारिका भगत यांनी व त्यांच्या महसूल पथकाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.