धुळे: धुळे खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू
Dhule, Dhule | Sep 15, 2025 धुळे येथील खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र पार्किंग आणि पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर २४ तास खुले ठेवले जाणार आहे. आकर्षक रोषणाई, यात्रा व दुकाने सुरू झाल्याने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.