छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी-पळशी रोडवरील ओंकार सिटी या बांधकाम साइटवरून बेपत्ता झालेली साडेपाच वर्षांची चिमुकली तिच्या घरापासून केवळ ३०० मीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. विशेष म्हणजे, याच विहिरीचा काही दिवसांपूर्वी तपास करण्यात आला होता.सिनू रामा चव्हाण (२३, रा. खापरखेडा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) यांची मुलगी होती.