पवनी: वसुबारस निमित्त पाताळेश्वर महादेव मंदिरात गौपूजन ; भंडारा-भाजपचे जिल्हा सचिव डॉ विजया ठाकरे नंदुरकर यांची उपस्थिती
Pauni, Bhandara | Oct 18, 2025 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास वसुबारसच्या पावन निमित्ताने पाताळेश्वर महादेव मंदिर परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक गौपूजन करून वसुबारस उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी गायीची पूजा-अर्चना करून हिंदू संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात भाजप जिल्हा सचिव डॉ. विजयाताई ठाकरे नंदुरकर यांनीही उपस्थित राहून गौपूजेत सहभाग नोंदविला आणि सर्वांना दिवाळी पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.