नेर: शहरातील अशोक नगर मध्ये घरफोडी,अज्ञात चोरट्याविरुद्ध नेर पोलिसात गुन्हा दाखल
Ner, Yavatmal | Nov 9, 2025 फिर्यादी रमा मून यांच्या तक्रारीनुसार सहा नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी ही शेतीच्या कामाकरिता घराला लॉक लावून गेली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून नगदी दहा हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण 29 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सात नोव्हेंबरला नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.