कळमनूरी: फ्रिजची वाहतूक करणाऱ्या कंटेनर वाहणाने अचानक घेतला पेट,दाती फाटा नजीकची घटना,बर्निंग कंटेनरचा थरार कॅमेरात कैद
हिंगोली नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर वाहन क्र . आर जे 14 जी एन 3037 हा दिल्लीकडून चेन्नईकडे 120 फ्रीज घेऊन जात असताना दाती फाटा जवळ आल्यानंतर आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास केबिनमध्ये अचानक आग लागून कंटेनर ने पेट घेतला आहे,या मार्गावरील बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.आखाडा बाळापूर पोलिसांनी अग्निशमन दलाला प्राचारण करून आग विझवून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत केली आहे.