दौंड: पुणे- सोलापूर महामार्गावर चौफुला येथे अपघात : ट्रॅव्हल्स बसचा टायर फुटल्याने एर्टिगा कारला धडक, एकाचा मृत्यू, अनेक जखमी.
Daund, Pune | Oct 11, 2025 पुणे सोलापूर महामार्गावरील चौफुला येथे १० ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास ट्रॅव्हल्स बसचा टायर फुटल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी ट्रॅव्हलबस दुभाजक तोडून सोलापूर महामार्गावर गेले. या बसने सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एर्टिगा कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला.