बिलोली: हुनगुंदा येथे साठवुन ठेवलेल्या 350 ब्रास लाल रेती मधील 48 हजार किमतीची 80 ब्रास लाल रेती चोरी; कुंडलवाडी पोलिसात गुन्हा
Biloli, Nanded | Nov 17, 2025 नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे हुनगुंदा येथे दि ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सात ते दि १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी आठच्या दरम्यान साठवून ठेवलेल्या ३५० ब्रास लाल रेती मधील ८० ब्रास लाल रेती किंमती ४८ हजार किमतीची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी तलाठी वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख हे आज करीत आहेत.