उदगीर शहरात पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकून पतंगाचा मांजा जप्त करून दोघावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात १३ डिसेंबर रोजी गुन्हे दाखल केले आहेत, उदगीर शहरातील कॉर्नर चौक,येथे टेलरिंग मटेरियलच्या दोन दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला पतंगाचा मांजा विक्री करीत असताना १३ डिसेंबर रोजी पोलिसांना मिळून आले पोलिसांनी दोन दुकानातून एकूण २० हजार ९० रुपयांचा पतंगाचा मांजा जप्त केला आहे,पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश भानुदास पवार यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.