भोकरदन: कोठा दाभाडी येथील तरुणाने तहसील कार्यालयावर अंगावर डिझेल ओतून घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न
आज दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील तहसील कार्यालयावर भोकरदन तालुक्यातील कोठा दाभाडी येथील तरुण नामे प्रल्हाद नीलक या तरुणाने गावातील सरपंच यांनी पदाचा गैरवापर करत ग्रामपंचायत कार्यालयात पाणीपुरवठा कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक स्वच्छता सेवक यासारखे ईतर पदे भरली आहे ती बे कायदेशीर आहे ती रद्द करावी या साठी हे आंदोलन केले आहे,पोलिसांनी व गट विकास अधिकारी यांनी मधस्थी करत आंदोलन संपले.