आंबेगाव: मंचरमधील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा खेळ
Ambegaon, Pune | Oct 21, 2025 मंचर नगरपंचायतीने स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. कॅमेऱ्यात सोमवारी रात्री १० ते रात्री ११ या वेळेत ३० ते ४० वयोगटातील दोघेजण संशयास्पद हालचाली करताना दिसले आहेत. त्यांनीच सांगाड्यावर पुष्पहार, लिंबू, टाचण्या आणि लाल कापड ठेवले असल्याचे कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे.