औंढा नागनाथ: श्री नागनाथ मंदिरात चंपाषष्ठी निमित्त श्री नागनाथाची खंडेरायाच्या रूपात विशेष पूजा,दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
औंढा नागनाथ येथील प्रसिद्ध आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात चंपाषष्ठी निमित्त दिनांक 26 नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता खंडेरायाच्या रुपात आभूषणे घालून पूजा सजवण्यात आली होती. मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, गार्ड प्रमुख बबन सोनुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची पुजारी शेखर भोपी, नागेश क्षीरसागर, मंगेश गुरव, नागेश गोरे, यांनी पूजा सजवली होती या मनमोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती,