आज दिनांक १२ डिसेंबर २०२५ शुक्रवार रोजी प्राप्त माहीती नुसार, समृद्धी महामार्गावर कारच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, दोन जण जखमी, अचानक ब्रेक मारल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती कारंजा जवळ यवतमाळ येथून देवदर्शनासाठी शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाले.ही घटना १० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.