राज्यातील विविध शहरांमध्ये पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅससाठी लागणाऱ्या रांगांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही केवळ एक 'पॅनिक' स्थिती असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.