कोयलारी(शेंडा) येथे भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्व खेळाडू, मान्यवर, ग्रामस्थ व कबड्डीप्रेमी यांचे मनापासून अभिनंदन केले. कबड्डी हा आपला मातीचा खेळ आहे जो केवळ शारीरिक बळच नव्हे तर संघभावना, चपळाई आणि उत्साह वाढवतो. दरम्यान या भव्य स्पर्धेत सर्व संघांनी उत्कृष्ट खेळ सादर करावा आणि गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.