धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडी प्रणित शहर विकास आघाडीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार लिलाताई सुरेश चौधरी यांचा विजय झाला आहे. रविवारी २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता झालेल्या मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून लिलाताई चौधरी ह्या आघाडीवर होत्या.