नागपूर ग्रामीण: वाडी येथे दोन दुचाकीची धडक ; एका दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
दुर्गेश मदने हे त्यांचा चुलत भाऊ आलोक मदने यांच्यासोबत दुचाकीने पोलीस ठाणेवाडी हद्दीतील चोखर धानी कडून नागपूरकडे येत असताना नागपूर कडून अमरावती कडे जाणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीला धडकून गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचाराकरिता विवेक हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान आलोकचा मृत्यू झाला या प्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन वाडी येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.