नरखेड: मोवाड येथे युवकाचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ, पोलिसांचा तपास सुरू
Narkhed, Nagpur | Sep 27, 2025 पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत येणाऱ्या मोवाड येथे युवकाच्या मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. शर्तीचे प्रयत्न करून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे . सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटण्यास सहाय्य झाले .मृतकाचे नाव चंद्रशेखर गणपतराव बारापात्रे असे सांगण्यात आले आहे.तो मोवाड येथील वार्ड नंबर पाच येथील निवासी होता.